पदभरतीत समाजकार्य पदवीधारक विद्यार्थ्यांवर अन्याय
समाजकार्य विद्यार्थी संघटनेकडून  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

गडचिरोली : सहाय्यकआयुक्त, समाज कल्याण गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण त्वरित करणे बाबत समाजकार्य पदवीधरां कडून  मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीनुसार सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण, गट अ या पदासाठी समाजकार्य पदवीधरांचा अर्ज योग्य पात्रता नाही असे दर्शवून  अस्वीकृत केला जात आहे .वर्ग एक चा पदाकरीता समाज कार्य पदवी ( bsw) यांना जाणीव पूर्वक डावलून इतर शाखेच्या पदवीधारक यांना संधी दिली जात आहे. मात्र, इतर पदवी घेऊन समाजकार्याची पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जात आहे. हा तांत्रिक भेद आहे की आयोगाचा दुजाभाव हे समजायला मार्ग नसून याबाबत समाजकार्याचे पदवी आणि पदवीव्योत्तर शिक्षण घेतलेल्या आणि या जागेसाठी अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार अधिक पात्र असणाऱ्या राज्यभरातील समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सामाजिक न्याय विभाग यांना मेल, निवेदने पाठवून आपला रोष व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे समाज कल्याण अधिकारी गट ब पदासाठी केवळ बीएसडब्ल्यू एमएसडब्ल्यू पदवीधारकांनाच घ्यावे असे स्पष्ट सेवा प्रवेश नियम १९६४ 1980 असताना अर्ज भरताना अनुभव नसेल तर अर्ज सादर होत नाही.
 तसेच इतर पदवीधरांना क्षेत्र कार्य, गटकार्य ,समुदाय विकास ,दुर्बल घटक अभ्यास, सामाजिक समस्या व त्या सोडवण्याच्या पद्धती यांचा अभ्यास नसतानाही त्यांना अर्ज करण्यासाठी संधी दिली जाणे गैर आहे.

समाजकार्याच्या व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित पदांची कर्तव्ये  निगडित असल्याने एम .एस. डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांचा या जागेसाठी विचार व्हायचा मात्र वस्तू स्थिती नाकारून शासन प्रशासन समाजकार्य पदवी व द्वि पदवी धारकावर अन्याय करते आहे. हा अन्याय दूर  करावा अन्यथा तीव्र संघर्ष छेडला जाईल असा इशारा निवेदन देतेवेळी समाजकार्य पदवीधर विद्यार्थी संघटनेचे वतीने देण्यात आला यावेळी निवेदन देताना नितेश दाकोटे,विजय सिडाम, आकाश अंबोरकर , आकाश मेश्राम, प्रमोद गुरणुले, मुकेश भोयर ,धीरज सेलोटे आशिष म्हशाखेत्री , अचुत बटे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments