'त्या' प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार

सामाजिक कार्यकर्ते तथा लोककल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल डांगे यांची चेतावणी


गडचिरोली : आष्टी ग्रामपंचायतने ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत बांधकाम केलेल्या ४४ नवीन दुकान गाळ्यांचे बांधकाम, गाळ्यांचे विस्तारीकरण इत्यादी कामामध्ये भ्रष्टाचार केला असून या कामाची जिल्हास्तरावरून फेर चौकशी  अहवालात दोषी आढळलेल्या अधिकारी आणि अभियंत्यावर कारवाई प्रस्तावित आहे.  जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून अंमलबजावणी केली जात नाही. आगामी दोन महिन्यांत प्रस्तावित कारवाई वर अंमलबजावणी न झाल्यास नाइलाजाने अंमलबजावणी अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली जाईल अशी चेतावणी आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लोककल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल डांगे यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


 ऊल्लेखनीय आहे की जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टी येथे १ कोटी १८ लाख रुपयांच्या या गाळे बांधकामावर राहुल डांगे यांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बीडीओंनी चौकशी समिती बसविली होती. मात्र त्यातील सदस्य असलेल्या लेखाधिकाऱ्यांची त्या अहवालावर सहीच नव्हती. लेखाधिकारी महिनाभराच्या सुटीवर गेल्या. त्यामुळे अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि जिल्हास्तरावरून पुन्हा चौकशी समिती गठीत करून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा अशी मागणी राहुल डांगे यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या फेरचौकशी अहवालात गाळे बांधकामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात तत्कालीन ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता चामोर्शी आणि संवर्ग विकास अधिकारी हे चार अधिकारी दोषी असल्याचे म्हटले आहे.

  आष्टी येथील १ कोटी १८ लाख रुपयांच्या या गाळे बांधकामावर पंचायत समितीचे नियंत्रण हवे होते. परंतू ते ठेवले गेले नाही. शाखा अभियंता यांनी मोका चौकशी न करताच अंदाजपत्रक तयार केले, अशा अनेक अनियमितता हरिदास टेंभुर्णे यांनी केल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तत्कालीन प्रभारी ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे यांनी गाळेधारकांकडून  प्राप्त १कोटी ५८ लक्ष ११ हजार अनामत रक्कम खर्च करता येत नसतानाही ती खर्च केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

सदर अहवालाची फाइल ४ महिण्यांपेक्षा अधिक काळापासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धुळ खात पडून असून त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला आणखी दोन महिन्यांचा कालावधी निवेदनातून डांगे यांनी दिला आहे. या कालावधीत अहवालावर अंमलबजावणी न झाल्यास नाइलाजाने याविरोधात न्यायालयात जावे लागेल असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला लोककल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल डांगे, भ्रष्उटाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार उपाध्यक्ष अरुण शेडमाके, विपूल खोब्रागडे ऊपस्थित होते.

Post a Comment

0 Comments