Police पोलिसांची रेकी करणाऱ्या नक्षलवाद्यास अटक

नक्षलविरोधी विशेष पथकाची कारवाई



गडचिरोली : कांकेर-गडचिरोली सीमाभागातील पोलीस ठाण्यावर पाळत ठेऊन मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. चैनुराम उर्फ सुक्कु वत्ते कोरसा ( ४८, रा. टेकामेट्टा छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शुक्रवारी मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने ही धाडसी कारवाई केली.

शुक्रवारी गडचिरोली पोलिसांना छत्तीसगड सीमेवरील जारावंडी-सोहगाव जंगल परिसरात संशयास्पद व्यक्ती पाळत ठेऊन असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. यावरून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तत्काळ पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाला त्याभागात पाठवून अभियान राबविले. दरम्यान, जारावंडी ते सोहगाव मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळ चैनुराम हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो जारावंडी व पेंढरी पोलीस पथकावर पाळत ठेऊन काही दिवसात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली.

Post a Comment

0 Comments