उद्यापासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह ; पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवरगडचिरोली : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी कोणत्याही प्रकारची हिंसक घटना घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नक्षली चळवळीद्वारे दरवर्षी 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह साजरा केला जातो. या वर्षीही नक्षल्यांद्वारे सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत नक्षलवादी जिल्ह्यात हिंसक घटना घडविण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात घेता कोणत्याही प्रकारच्या हिंसक घटना टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, उपपोलीस ठाणे, पोलीस मदत केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीम तीव्रतेने राबवून विशेष दक्षता ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments