गडचिरोली : शहरातील कारगील चौक येथील स्मारक येथे ६८ व्या महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी शालेय विद्यार्थी तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात संविधान अमृत महोत्सवी वर्ष निमित्याने सार्वजनिक ठिकाणी महिलाना ध्वजारोहण करण्याचा मान प्रथमच याप्रसंगी देण्यात आला. सौ.नलिनी सुनील देशमुख यांच्या हस्ते कारगील स्मारक येथे ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ध्वजरोहन कार्यक्रम प्रसंगी कारगील चौक चे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, विजय साळवे, संजय गद्देवार,रुपेश सलामे, महेंद्र मसराम, वासनिक सर, सुचिता धकाते,प्रा. सुनीता साळवे, शिक्षिका वंदना वाणी, मुख्याध्यापिका मीरा मडावी, भोयर आदी प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक गेडाम मार्गदर्शनात यांनी संचलन केले.
स्थानिक गुरुदेव उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments