एटापल्ली तालुक्यातील शंभर गावे अंधारात,

 कडक उन्हाच्या उकाड्याने नागरिक हैराण,


एटापल्ली;
              तालुका मुख्यालयापासून पाच की. मी. परिघाच्या बाहेरील तसेच पोलीस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्थापन असलेली गावे व सुरजागड लोहखनिज प्रकल्प परिसर वगळून तालुक्यातील इतर शंभरावर अधिक गावांत गेली पंधरा ते विस दिवसांपासून  वीज पुरवठा खंडित असल्याने पंचाहत्तर टक्के तालुका काळोखात गेला असून रखरखत्या उन्हाच्या उकड्यात नागरिक हैराण झाले आहेत,
         आदिवासी बहुल, अविकसित, नक्षल प्रभावी जवेली (खुर्द), कुंडम, बुर्गी, वेळमागड, गणपहाडी, नैनवाडी, तोडगट्टा, बोदिलटोला, पुसकोटी, मासूनटोला, इंदूर, रेंगाटोला, दोडहूर, ताडगुडा, मर्दाकुही, देवपाडी, रेकलमेट्टा, रेकबटाळ, मुरेवाडा, नैतला, कोईनवर्षी, हचबोडी, हिक्केर, वटेली, जाजावंडी, बेसेवाडा, मोहंडी, माटवर्षी, वाळवी, खिदारटोला, गिलनगुडा, कुंजेमर्का, गोरगुट्टा, येरदळमी, गुडनजुर, जंबिया, गट्टागुडा, मोडस्के, टिटोळा, झारेवाडा, पामाजीगुडा, पुस्के, अडंगे, गेदा, चंदनवेली, बारसेवाडा, तांबडा, ताडपल्ली, एकनसुर, मवेली, देवदा, कचलेर, गटेपल्ली, वट्टेगट्टा, कोठी, पेठा, बट्टेर, रेगादंडी, कोरेनार, धोबेगुडा, कोकोटी, ऐकरा (खुर्द), ऐकरा (बूज), झारेवाडा, बांडे, कुदरी, नागुलवाडी, मोहूर्ली, हेटळकसा, लांजी, घोटासुर, व गुंडाम अशा शंभरहून अधिक गावात गेली पंधरा ते वीस दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असून विद्युत वितरण कंपनी व स्थानिक प्रशासनाकडून खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली केल्या जातांना दिसून येत नाहीत, त्यामुळे दिवसेंदिवस  वाढत चाललेला                   उन्हाचा पारा बेचाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस अंशावर पोहचत आहे, उकडत्या तापमानात गर्मीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, वयोवृद्ध, लहान बालके, आजारी नागरिक व गरोदर माता भगिनींना उन्हाच्या तडाख्यामुळे गर्मीच्या उखड्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती वापराचे  फ्रीज, कुलर, पंखे, मोबाईल संच, पीठ गिरणी, अशी विद्युत उपकरणे धुडखात पडली असून गंजून खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे, वरील समस्येवर नागरिकांकडून तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदन देऊन व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देण्यात आल्यानंतरही प्रशासनाकडून खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या समस्येवर कोणतीही कारवाही केली जात असल्याचे दिसून आले नाही.  
         त्यामुळे गेली पंधरा ते दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करून देण्याची मागणी नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलीस पाटील सादु दुर्वा, माजी सरपंच सादु गावडे, देऊ पुंगाटी, दत्तू उसेंडी, प्रभाकर कुकटलावार, नंदू मट्टामी, देऊ गावडे, दलसु मितलामी,  व नागरिकांनी केली आहे, अन्यथा मूलनिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा  देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments