डॉ. मिलींद नरोटे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी होणार साजरा

 

गडचिरोली : डॉ. मिलींद नरोटे यांच्या
वाढदिवसानिमित्य मित्र परिवारांच्या वतीने  मंगळवार ता. 30 जुलैला गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 7.30 वाजता स्मृती व्हॉलीबॉल क्लब मध्ये वृक्षारोपण, सकाळी 9 वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात पफळवाट, सकाळी 11 वाजता महिला व बाल रूग्यालयात नवजात शिशूना आवश्यक साहित्य वाटप, दुपारी 12.15 वाजता मातोश्री वृध्दाश्रमात वस्त्रदान, दुपारी 12.30 वाजता सेमाना देवस्थान येथे दर्शन व महाप्रसाद वितरण, दुपारी 1 वाजता मुरखळा व नवेगाव जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक व संगीत साहित्य वाटप, त्याचबरोबर चामोर्शी, तळोधी, आष्टी येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा आंबेशिवणी ग्रामपंचायतचे उपसरपंच योगाजी कुडवे  व मित्र परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments