गडचिराेली ः गडचिराेली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आहे. आकांक्षीत जिल्हा असल्याने येथील बेराेजगारी लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील 'क' व 'ड' संवर्गातील पदे पाेलिस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवारांकडून भरण्यात यावी व तसा शासन निर्णय काढण्यात यावा, यासाठी गाेंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिराेली जिल्हाधिकार्ऱ्यांर्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठविले आहे. यावेळी बहुसंख्य युवा बेराेजगार उपस्थित हाेते.
जिल्ह्यात अनेक युवा डि. एड., बी. एड., पदविधारक आहेत. मात्र, त्यांच्या हाताला काम नाही. त्यातच पाेलिस भरती वगळता प्रशासकीय विभागात बाहेर जिल्ह्यातील बेराेजगारांना संधी देण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील युवा बेराेजगारांवर अन्याय हाेत असून बेराेजगारांची फाैज तयार हाेत आहे. जिल्ह्यातील युवकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पाेलिस भरती प्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील 'क' व 'ड' संवर्गातील पदे स्थानिक उमेदवारांकडून भरण्यात यावीत व तसा शासन निर्णय काढण्यात यावा, यासाठी सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
गाेंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या रास्त मागणीला जिल्ह्यातील बेराेजगारांची साथ असून शासन निर्णयाची वाट बघत आहेत.
0 Comments