शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रूपयांचे बक्षिस
गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 674 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु, दलम कमांडर (भामरागड दलम), वय 27 वर्ष, रा. पिडमिली ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छ.ग.) व त्याची पत्नी नामे 2) रोशनी विज्या वाचामी, दलम सदस्य (भामरागड दलम), वय 24 वर्षे, रा. मल्लमपोड्डुर, ता. भामरागड, जि. गडचिरोली या जहाल माओवादी दाम्पत्याने गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1) वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु
दलममधील कार्यकाळ
शासन 2015 मध्ये कोंटा एरीया मध्ये भरती होऊन सदस्य पदावर
कार्यरत.
सन 2015 ते 2020 पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी
याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत.
नोव्हेंबर 2020 ते 2022 पर्यंत भामरागड दलम मध्ये बदली
होऊन उपकमांडर पदावर कार्यरत.
सन 2022 ते आजपावेतो भामरागड दलममध्ये दलम कमांडर पदावर कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
त्याचेवर आजपर्यंत एकुण 15 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 10-चकमक व 05-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.
2) रोशनी विज्या वाचामी
दलममधील कार्यकाळ
सन 2015 मध्ये राही दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर
कार्यरत.
सन 2016 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन
सन 2017 पर्यंत कार्यरत.
सन 1017 मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन
सन 2019 पर्यंत कार्यरत.
सन 2019 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2021 पर्यंत कार्यरत.
सन 2021 मध्ये गट्टा दलममध्ये बदली होऊन सन 2022 पर्यंत कार्यरत.
सन 2022 मध्ये परत भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो पार्टी मेंबर पदावर कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
तिचेवर आजपर्यंत एकुण 23 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 13-चकमक, इतर-10 गुन्ह्रांचा समावेश आहे.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.
नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
गडचिरोली जिल्ह्रात तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस.
श्व् महाराष्ट्र शासनाने वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
श्व् महाराष्ट्र शासनाने रोशनी विज्या वाचामी हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रोशनी विज्या वाचामी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. असे एकुण 11.5 लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 27 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
0 Comments