निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बॉम्बस्फोट ; एका स्फोटकाला निकामी करण्यास पोलिसांना यश



गडचिरोली: आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या दृष्टीने भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर माओवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके निकामी करण्यात बॉम्बशोधक पथकाला यश आले आहे. तर एका स्फोटकाचा निकामी करीत असताना स्फोट झाला. मात्र, सुदैवाने जवानांना कुटलीही दुखापत झाली नाही. या परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS) बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले.शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.
सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments