काशीपूर पाणी विषबाधा दुर्घटना: आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून तातडीची मदत


चामोर्शी :  तालुक्यातील काशीपूर गावात पाणीपुरवठा योजनेतून झालेल्या विषबाधेमुळे अनेक ग्रामस्थ आजारी पडले असून, त्यांना उपचारासाठी गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दुर्दैवाने एका महिलेचा मृत्यू झाला असून, ही घटना अत्यंत दुखद आणि वेदनादायी आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या संकटकाळात काशीपूरच्या ग्रामस्थांच्या दुखात सहभागी होत त्यांना सांत्वन व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी घेतलेल्या उपाययोजनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
तात्पुरती आरोग्य सेवा: काशीपूर येथील जिल्हा परिषद शाळेत तात्काळ वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका व्यवस्था: ग्रामस्थांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी तीन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा दुरुस्ती: पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित दुरुस्तीचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. नरोटे यांनी यां  संकटकाळात काशीपूरमधील प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून "ग्रामस्थांनी कोणतीही काळजी करू नये. आवश्यक ती सर्व मदत आणि सेवा सातत्याने पुरवली जाईल," असे त्यांनी सांगितले. तसेच, सुरक्षित पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, ग्रामस्थांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, चामोशी तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, महिला मोर्चा अध्यक्ष कविताताई किरमे, माजी तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, निरजजी रामानुजनवार, नरेशजी अलसावार, हर्षदजी भांडेकर आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

या घटनेने सुरक्षित पाणीपुरवठ्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments