गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मौजा मोडस्के जंगल परिसरात गट्टा जांबिया गट्टा दलमचे काही माओवादी लपून बसल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली C-60 कमांडोच्या पाच पथकांनी आणि सीआरपीएफच्या 191 बटालियनच्या ई कंपनीने संयुक्त अभियान राबवित दोन महिला माओवाद्यांचा खात्मा केला.
या कारवाईदरम्यान, जंगल परिसराची बाहेरून घेराबंदी करून शोध मोहीम राबवली जात असताना माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रभावी प्रत्युत्तर देत चकमकीनंतर जंगल परिसरात शोध घेतला असता दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह, एक स्वयंचलित एके-47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे.
0 Comments