तब्बल ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करत दिला मानवतेचा प्रेरणादायी संदेश

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा कौतुकास्पद उपक्रम 

गडचिरोली : सामाजिक बांधिलकी जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर विभाग ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’ तर्फे कोंसरी आणि सुरजागड येथे आयोजित मेगा रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करत मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या ५०१ रक्तदात्यांच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः रक्तदान करून केली. त्यांच्या या कृतीतून “रक्तदान हे केवळ दान नसून जीवन वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे,” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. शिबिरादरम्यान उत्साह, सहभाग आणि एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कंपनीचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला मानवसेवेचे स्वरूप दिले. यामुळे समाजातील सकारात्मकता आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली.


यावेळी बोलताना श्री प्रभाकरन यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “रक्तदानासारख्या साध्या उपक्रमातूनही एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.” त्यांच्या या आवाहनामुळे अनेकांनी नियमित रक्तदान करण्याचा संकल्पही व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमातून कंपनीची सामाजिक जाणीव आणि जबाबदारी पुन्हा अधोरेखित झाली असून, भविष्यातही अशा मानवतावादी उपक्रमांना चालना देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे स्पष्ट झाले.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ही एक अग्रगण्य औद्योगिक संस्था असून, औद्योगिक प्रगतीसोबतच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहे.

 

#Gadchiroli #GadchiroliNews #BloodDonation #BloodDonationCamp #MegaCamp #DonateBloodSaveLives #SaveLives #HumanityFirst #LifeSaving #777Donors #RecordBreaking #Prabhakaran #LloydsMetals #CSR #SocialResponsibility #CommunitySupport #PublicParticipation #Inspiration #BeTheChange #HealthAwareness #PositiveNews #GoodNews #IndiaCares #TrendingNews #ViralNews #BreakingNews #LatestNews

Post a Comment

0 Comments