थोर समाजसेवक, सेवाभावी व्यक्तीमत्व असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे अनंतात विलीन

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयाचे थोर समाजसेवक, सेवाभावी व्यक्तीमत्व असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे हे मंगळवार ता. २८ एप्रिलला सकाळी ११ वाजता वयाच्या ८० व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे, सुन, तीन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर आज सांयकाळी ६ वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. शिवनाथ कुंभारे हे मुळ आरमोरी येथील रहिवासी असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या घरी आले होते, तेव्हापासुन ते डॉक्टरी पेशासोबत सेवाभावी वृत्ती बाळगुन समाजाची निरंतर सेवा करीत होते. भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अण्णा हजारे यांच्या संर्पकात येऊन डॉक्टर कुंभारे भ्रष्टाचार निमुर्लनाचे काम करीत राहीले. अड्याळ टेकडी येथील गिताचार्य तुकाराम दादा यांच्या सोबत अनेक वर्षे काम करून गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्षपद चांगल्या रितिने भुषवून अनेक गावांत गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा निर्माण केल्या. रामनगर येथील गुरुदेव सेवा मंडळात ते नेहमीच हजेरी लावत असत. पहाटे पासुन गुरुदेव सेवा मंडळात मार्गदर्शन, भजन, किर्तन, ध्यान करायचे सकाळी ११ ते रात्रौ १० वाजेपर्यत दवाखान्यात रुग्णाची सेवा करायचे. सांयकाळी कार्यक्रम असला तरी ते तिथेही हजर राहत असत. लोकसेवेच्या कामाकरीता नक्षलग्रस्त आदिवासी भागांत ते जात असायचे. वैद्यकिय सेवेसोबत समाजकार्य करीत असताना मागील दोन वर्षापासुन ते आजारी होते आज मंगळवार दि. २८ एप्रिलला त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments