ॲड. विश्वजीत कोवासे यांनी घेतल्या ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आरमोरी, वडसा, कुरखेडा व कोरची तालुक्यांचा दौरा करून काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
या दौऱ्यादरम्यान पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष संघटन मजबूत करून जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.


0 Comments