
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या शहरांतर्गत मासिक बैठकीचे आयोजन गुरुवारी दुपारी कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले. या बैठकीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक कामात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान ‘सरल ॲप’च्या प्रभावी वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, विशेषतः SIR संदर्भात व्यापक जनजागृती करणे आणि मतदान प्रक्रियेतील तांत्रिक बाबी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आल्या.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत त्यावर योग्य कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीला नगराध्यक्ष अँड. सौ. प्रणोतीताई निंबोरकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती श्री. अनिलजी कुनघाडकर, भाजपा महामंत्री तथा नगर परिषद उपाध्यक्ष श्री. निखिलजी चरडे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा तथा महिला व बालविकास सभापती सौ. सीमाताई कन्नमवार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments