शहरात विकासाला गती – नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार, डॉ. मिलिंद नरोटे व नगराध्यक्षा अँड प्रणोती सागर निंबोरकर यांच्या पुढाकाराने गोकुळ नगरातील बहुप्रतिक्षित रस्ता पूर्ण
गडचिरोली : शहरातील गोकुळनगर वॉर्ड क्रमांक 23 मध्ये गेल्या दोन दशकांपासून पक्का रस्ता नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून ये-जा करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी करूनही हा प्रश्न प्रलंबितच राहिला होता. मात्र, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. रस्त्याच्या कामासाठी त्यांनी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून शहरातील गोकुळ नगर वार्ड क्र. २३ मधील रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तब्बल २० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. सुंदरा करकडे यांच्या घरापासून बेबीनंदा डोंगरे यांच्या घरामार्गे पुल्लेवार यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरातील प्रलंबित मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेत गोकुळ नगरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीची दखल घेतली. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक वार्डापर्यंत विकास पोहोचवणे हे नगर परिषद प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे तसेच नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, अनिलभाऊ कुनघाडकर बांधकाम सभापती नगरपरिषद गडचिरोली, सौ. साक्षी आकाश बोलुवार नगरसेविका, घनश्याम वाढई भाजपा कार्यकर्ता, सागर सोनटक्के, आकाश बोलुवार, आशिष वाढई, आशिष सातपुते, मिथुन गेडाम, बेबीनंदा डोंगरे यांचे आभार मानले आहेत. “वर्षानुवर्षे केवळ आश्वासने मिळत होती, मात्र आता प्रत्यक्ष विकासकाम पूर्ण झाल्याने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या रस्त्यामुळे केवळ वाहतुकीची सुविधा सुधारली नसून परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. स्वच्छता व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
तसेच गडचिरोली शहरातील विविध प्रभागांमध्येही रस्ते, नाली, स्वच्छता, मूलभूत सुविधा व इतर विकासकामांना गती देण्यात येत असून, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रलंबित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
“गोकुळ नगरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. शहरातील प्रत्येक भागात मूलभूत सुविधा पोहोचवून विकासाचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील,” अशी भूमिका नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी व्यक्त केली.
२० वर्षांची प्रतीक्षा संपवत गोकुळ नगरातील हा रस्ता विकासाचे नवे पर्व सुरू करणारा ठरला असून, नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा हा विकासाचा मार्ग ठरला आहे.
0 Comments