शिधापत्रिकाधारकांना मका ऐवजी गव्हाचे पुर्ववत वाटप करामहाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांची मागणी

गडचिरोली जिल्हयात शिधापत्रिकाधारकांना गहू वाटप न करता  निकृष्ट दर्जाचा मका वाटप केला जात आहे.  त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या जेवनातून पोळी गायब झाली आहे. मक्याचा कोणताही उपयोग होत नसून शिधापत्रिकाधारकांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे  शिधापत्रिकाधारकांना मका वाटप न करता पुर्ववत गव्हाचे वाटप करावे , अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कुणाल पेंदोरकर यांनी स्पष्ट केले आहे की,  केंद्र शासनाने देशात अन्न सुरक्षा योजना लागू केली आहे. गोरगरीब नागरिक अन्नधान्यापासून वंचीत राहू नये म्हणून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत  शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू व तांदूळ पुरवठा केला जात आहे. शासनाच्या निकषानुसार अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो धान्य, तर प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना  प्रती व्यक्ती 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू  वितरीत केले जाते. एकीकडे सरकार देशात अन्नधान्याचा तुटवडा नसल्याचे सांगत असतांना शासकीय राशन दुकानातून गव्हाऐवजी मका का वाटप केला जात आहे, असा सवालही कुणाल पेंदोरकर यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोली जिल्हयात तांदूळ हे प्रमुख पिक आहे. आहारात भाताचा अधिक वापर होत असला तरी जेवनात भात पोळी महत्वाचे व्यंजन आहे. गोरगरीब नागरिक खाजगी दुकानातून  पस्तीस ते चाळीस रूपये  किलो दराचे गहू खरेदी करू शकत नाही. शिधापत्रिकाधारकांनी राशन दुकानदाराला गव्हाबाबत विचारणा केली असता  शासनाकडून गव्हाऐवजी मका पुरवठा केला जात  असल्याचे सांगण्यात येत आहे. मक्याचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नसून नाईलाजास्तव उचल करावी लागत आहे. सदर बाब लक्षात घेऊन शिधापत्रिकाधारकांना पुर्ववत गहू वितरीत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments