टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ;
सोने, हिरे आणि वधूच्या दागिन्यांचा विशेष संग्रह उपलब्ध होणार
गडचिरोली : विश्वासार्हता आणि १२४ वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या रोकडे ज्वेलर्सचे भव्य दालन आता गडचिरोली शहरात सुरू होत आहे. चंद्रपूर-मूल मार्गावर उभारण्यात आलेल्या या दालनाचे उद्घाटन १५ ऑक्टोबर रोजी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रोकडे ज्वेलर्सच्या संचालक मंडळाने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे १० दालने यशस्वीपणे चालविल्यानंतर रोकडे ज्वेलर्सने गडचिरोलीतही विस्तार केला आहे. नव्या दालनात ग्राहकांना हॉलमार्कयुक्त सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने, पोल्की, कुंदन, वधूसाठी खास दागिन्यांचा संग्रह तसेच चांदीचे दागिने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
ग्राहकांची सुरक्षितता, खरेदी-विक्रीतील पारदर्शकता आणि दर्जेदार दागिने उपलब्ध करून देणे याला कंपनीचे प्राधान्य असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. याच मूल्यांच्या आधारावर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सातत्याने केला जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
वाढत्या औद्योगिक संधींचा विचार
रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा पोलाद उद्योगाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात व्यापार आणि उद्योगविस्ताराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत नवीन दालन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला रोकडे ज्वेलर्सचे प्रवर्तक भैयाजी रोकडे, वंदना भैयाजी रोकडे, व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे, संचालक सारंग भैयाजी रोकडे, पारस राजेश रोकडे, प्रवर्तक अनामिका राजेश रोकडे आणि प्रवर्तक संस्कृती सारंग रोकडे उपस्थित होते.
दालनाच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री शिल्पा शिंदे यांची उपस्थिती हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नव्या दालनामुळे गडचिरोलीतील ग्राहकांना विविध प्रकारचे दागिने एकाच ठिकाणी पाहण्याची आणि खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


0 Comments