रोकडे ज्वेलर्सचे भव्य दालन सुरू; १२४ वर्षांचा सुवर्ण वारसा गडचिरोलीत नव्या रूपात


१२४ वर्षांचा सुवर्ण वारसा गडचिरोलीत नव्या रूपात
गडचिरोली, गडचिरोली, ब्युरो. दागिन्यांच्या क्षेत्रात १२४ वर्षांहून अधिक काळ विश्वासाची परंपरा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सच्या भव्य आणि अत्याधुनिक दालनाचे गडचिरोलीत शानदार उद्घाटन झाले. रोकडे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य भैयाजी रोकडे, वंदना रोकडे आणि प्रमुख अतिथी पुरुषोत्तम कावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या दालनामुळे गडचिरोलीकरांना विविध प्रकारचे पारंपरिक आणि आधुनिक दागिने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. चंद्रपूर-मूल मार्गावर हॉटेल जिंजरजवळ असलेले हे दालन ३ हजार ६०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात उभारण्यात आले आहे. आधुनिक सुविधा, दागिन्यांची विस्तृत श्रेणी आणि स्वतंत्र पार्किंगची सोय ही या दालनाची वैशिष्ट्ये आहेत. उद्घाटनप्रसंगी रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे, संचालक सारंग भैयाजी रोकडे, पारस राजेश रोकडे, अनामिका राजेश रोकडे आणि संस्कृती सारंग रोकडे यांच्यासह रोकडे कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते. कुंदन, वधूंसाठीचे विशेष दागिने तसेच उच्च दर्जाच्या चांदीच्या दागिन्यांचे आकर्षक संग्रह उपलब्ध आहेत. दागिन्यांपासून आधुनिक डिझाइनपर्यंत विविध पर्याय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत.

१५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष सवलती
दालनाच्या उद्घाटनानिमित्त रोकडे ज्वेलर्सने १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरः घडणावळीवर सरसकट ५० टक्के सूट.हिऱ्यांच्या दागिन्यांवरः घडणावळीवर सरसकट १०० टक्के सूट. विशेष ब्रेदी कूपनः प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी घडणावळीमध्ये २५ टक्के सूट देणारे कूपन. या सवलतींसाठी नियम व अटी लागू राहतील. तसेच, २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ ५ टक्क्यांपासून सुरू होत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. आधुनिक ग्राहकांच्या पसंतीनुसार १८ कॅरेटच्या साध्या सोन्याच्या दागिन्यांचाही विस्तृत संग्रह उपलब्ध आहे.

पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकसेवेवर भर
ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कंपनीकडून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी मोफत कॅरेटमीटर सेवा, मोफत ज्योतिषीय मार्गदर्शन, ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करण्याची सुविधा आणि जुन्या सोन्याच्या वितळवण्याच्या प्रक्रियेची नोंद ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. कराच्या पावतीवर व्यवहाराचा तपशील देणे आणि खरेदीदरम्यान ग्राहकांना स्पष्ट माहिती उपलब्ध करून देणे, हीदेखील दालनाची वैशिष्ट्‌ये असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments