पावसाचा कहर :दोघांना जलसमाधी



पांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सकाळी सात पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पूर  आला आहे. ओढे देखील दुथडी वाहू लागले आहे जिल्ह्यातील अनेक गावात परिस्थिती निर्माण झाल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावालगत नाल्यातील पूर आल्याने  दोघांना  जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. ही घटना पांढरकवडा तालुक्यात घडली . गावक-यांनी शर्थीचे प्रयत्न करुनही त्यात त्यांना यश आले नाही. 

भारत पुरुषोत्तम राठोड (वय १३ वर्षे रा. दहेली तांडा )  व बंडू राघोजी कोहचाडे (वय ५५ वर्षे) रा. सोनबर्डी असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील दहेली तांडा येथे १३ वर्षीय चिमुकला दुपारी ३.३० वाजता शौच्छालयास जातो म्हणून घराबाहेर पडला परंतु तो परतलाच नाही. रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही. सोमवारी (ता.१२) गावालगत नाल्यात शोध  घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बघताच कुटूंबानी एकच टाहो फोडला. घटनेनंतर याप्रकरणी सुभाष हरी राठोड यांनी केळापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दुस-या घटनेत सोनबर्डी येथील बंडू राघोजी कोहचाडे (वय ५५) हे रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शेतातून परत येतांना घात झाला. पुलावर गुडघ्या पर्यंत पाणी वाहत होते. त्यांनी या पाण्यातून गावांमध्ये येण्याचा प्रयत्न केल असता त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडून पूरात वाहून गेले. यावेळी त्यांना गावातील संदीप कन्नाके यांनी पाहिले. परंतु पुलावर पाणी जास्त असल्याने त्यांना वाचविता आले नाही. गावकर्यांनी मिळून शोध घेतला असता ते आढळून आले नाही. अखेर सोमवारी सकाळी ८वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आकोली शेतशिवारामध्ये नाल्यात आढळला. याप्रकरणी राजू अरुण कोहचाडे यांनी केळापूर पोलिसांत तक्रार दिल्यावरून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments