गडचिरोलीचे सुधीर गोहणे ठरले "नवोदयन आँफ द इयर- महाराष्ट्र" चे पहिले मानकरी

नवसवांद प्रकाशन व जवाहर नवोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांचे कडून निवड


गडचिरोली : शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांना  "नवोदयन ऑफ द इयर" पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ते या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करीता गडचिरोलीचे सुधीर  गोहणे यांना यावर्षीचा  'नवोदयन आँफ द इयर' हा पुरस्कार पत्रकार भवण, पुणे येथे 89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नवोदय विद्यालय समिती पुणेचे आयुक्त बि. वेंकटेश्वरण यांच्या हस्ते हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रात 34 नवोदय विद्यालय आहेत. यांची  ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने नवोदय विद्यालयाची स्थापना1986 मध्ये करण्यात आली. या मधून आजतागायत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेत. Come to learn and Go to serve या ध्येयाने हे सर्व विद्यार्थी सर्वच क्षेत्रात समाजबंध राखून कार्य करीत आहेत. यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घ्यावे या करीता नवसंवाद प्रकाशन व संपूर्ण भारतभरातील नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ यांचे वतीने वैद्यकीय, सामाजिक, कला व संस्कृती, शिक्षण या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या नवोदयन्सना सन्मानित करण्यासाठी 2022 मध्ये 'सुपर अवार्ड्स' 'नवोदयन आँफ द इयर' सुरू करण्यात आले.  शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करीता गडचिरोली चे सुधीर  गोहणे यांना यावर्षीचा  'नवोदयन आँफ द इयर' हा पुरस्कार पत्रकार भवण, पुणे येथे 89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नवोदय विद्यालय समिती पुणे चे आयुक्त बि. वेंकटेश्वरण यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सुधीर गोहणे यांनी पालकांच्या मदतीने नगर परिषद शाळेला उर्जितावस्थेतून बाहेर काढून नवरुप दिले आहे. नगर परिषद शाळेला समाजात मानाचा स्थान मिळवून दिले, या शाळांमध्ये सुध्दा गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळू शकते व याचा फायदा समाजातील शेवटच्या स्तरावरील विद्यार्थ्यांना होतो हे दाखवून दिले. शहरातील विविध इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत स्पर्धा करुन गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर हि आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी हा सन्मान आहे.

Post a Comment

0 Comments