नदीपात्रातून साडेचार लाखाचे सागवान लठ्ठे जप्त lokpravah.com

झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील पथकाची कारवाई



सिरोंचा : झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणा-या वनकर्मचा-यांनी कर्जेली नदीपात्रातून सागवान तस्करीचा पर्दाफाश करीत साडेचार लाख रुपये किमतीचे सागवान लठ्ठे जप्त केल्याची कारवाई झिंगानुर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी केली.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणा-या इंद्रावती नदीची उपनदी कर्जेली गावाजवळून वाहते. या नदीपात्रातून सागवान लठ्‌ठ्यांची  तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने कर्जेली घाटावर सापळा रचून नदीपात्रातील सागवान लठ्ठे दोन दिवसांच्या परीश्रमानंतर बाहेर काढले. या कारवाईत वनविभागाने जवळपास 4 लाख 66 हजार 198 रुपयांचे 6.454 घनमीटर 37 नग सागवान लठ्ठे नदीपात्रातून जप्त केले. ही कारवाई झिंगानूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. बारसागडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक तिरुपती सडमेक, महेंद्र हिचामी, विनोद गावडे, सचिन म्हस्के, अशोक गोरगोंडा, राम जोखडे, तेमासिंग गोटा, आशिश कुमरे, सुधाकर महाका, कोरेत यांच्यासह वनमजूर बक्का मडवी, निलेश मडावी, सुधाकर गावडे, समय्या आत्राम, श्रीकांत कोंडागोर्ला, सुभाष मडावी, महेंद्र कुमरी यांनी पार पाडली.



तस्कर फरार

कर्जेली नदीपात्रातून सागवान तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच, झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वनाधिकारी, कर्मचा-यांनी तस्करांना पकडण्यासाठी कर्जेली घाटावर सापळा रचला होता. मात्र, वनपथकाची चाहूल लागताच तस्कर सागवान लठ्ठे नदीपात्रातच सोडून पाण्यात उडी मारून पसार झाले. वनविभागाने अज्ञात सागवान तस्करांवर वनगुन्हा दाखल केला आहे. 

Post a Comment

0 Comments