अपघात व ट्रक जाळपोळ प्रकरणी ट्रक चालकासह अज्ञातांवर गुन्हा दाखल lokpravah.com
गडचिरोली :
मंगळवारच्या सायंकाळी दुचाकीने जात असलेल्या पती-पत्नीला सुरजागड येथून कच्चा माल वाहतूक करणा-या एका ट्रकने धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने 8 ट्रकांना आग लावली. तसेच पाच वाहनांची तोडफोड केली. घटनेबाबत अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ट्रक चालक तसेच 8 ट्रक जाळणा-या अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज वाहतूक करण्यासाठी विविध लोकांचे शेकडो वाहन लावण्यात आले आहेत. मंगळवारला झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शांतीग्राम-दामपूर मार्गावरील संतप्त जमावाने 8 ट्रकांना आग लावून दिली. या घटनेत एक कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आज पोलिसांच्या चोख बंदोबस्तात जळालेल्या ट्रकांना दिवसभर क्रेनद्वारे नियोजित स्थळी नेण्याची प्रक्रिया सुरु होती, अशी माहिती प्राणहिताचे अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आज रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Post a Comment

0 Comments