विदर्भ आंदोलन समितीने केली नागपूर काराराची होळी lokpravah.com



गडचिरोली केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तत्काळ निर्माण करावे, विजेची दरवाढ मागे घ्यावी, अन्नधान्यावरील वस्तु व सेवाकर (जीएसटी) रद्द करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये मदत जाहीर करावी या व इतर मागण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज, 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यात नागपूर कराराची होळी करून नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यात आला.
गडचिरोली येथील आंदोलनात जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, शहराध्यक्ष रमेश भुरसे, रुमाजी भांडेकर, दादाजी चापले, दत्तात्रय पाचभाई, गोवर्धन चव्हाण, अमिता मडावी, विजय शेडमाके, चंद्रशेखर जक्कनवार, दिवाकर पिपरे, केशवराव भडांगे, जनार्धन साखरे, रमेश उप्पलवार, पांडूर घोटेकर, चंद्रकांत शिवणकर उपस्थित होते. देसाईगंज येथील आंदोलनात जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीर शेख, युवा आघाडी अध्यक्ष अक्षय कुंदनवार, महासचिव बी. एम. शेंद्रे, महिला आघाडी अध्यक्ष अर्शी शेख, चंद्रशेखर बडवाईक, शबाना शेख, सलमा शेख, जैबून शेख, श्यामराव वाघाडे उपस्थित होते. अहेरी येथील दानशूर चौकात केलेल्या आंदोलनात समितीचे अध्यक्ष विलास रापर्तीवार, प्राचार्य डॉ. नागसेन मेश्राम, सुहास मेश्राम, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, विष्णु रापर्तीवार, अजय सिलवेती, अतुल सिंगरू, करण लोखंडे, उपस्थित होते. कुरखेडा येथे देसाईगंज मार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर यांनी केले. यावेळी घीसू खुणे, जिल्हा युवक आघाडी पूर्व अध्यक्ष ग्यांनचंद साहरे, रामचंद्र रोकडे, भागचंदलानी टहलानी, मुक्ताजी दुर्गे, खेडेगाव, पुराडा, हेटीनगर, कन्नडगाव, घाटी, कुंभीटोला व तालुक्यातील हजारो विदर्भवादी आंदोलक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments