कुमोद लाटकर हत्या प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी lokpravah.comगडचिरोली : शहरातील कुमोद लाटकर हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींमध्ये रोशन पवनसिंह ठाकुर (35) व अमोल नामदेव दडमल (25) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. 

प्राप्त माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य तलावाजवळील पाय-यांवर चार मित्रांची दारु पार्टी रंगली. या पार्टीत वाद झाल्याने कुमोदच्या मित्रांनी त्याची हत्या करुन मृतदेह तलावात फेकून दिला. घटनेच्या दोन दिवसानंतर प्रकरण उघडकीस आले. गडचिरोली पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणातील आरोपी रोशन ठाकूर व अमोल दडमल यांना दोन आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्यांच्या पीसीआरचा कालावधी संपल्याने आरोपींना दुस-यांदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments