नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी tiger Attack गिलगाव (जमी) शेतशिवारातील घटना

चामोर्शी : शेतात गवत कापत असताना वाघाने हल्ला करुन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना आज, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गिलगाव  (जमी) शेतशिवारात घडली. 

सुमनबाई डोकाजी भोयर (60) रा. गिलगाव  (जमी) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सुमनबाई भोयर या नेहमीप्रमाणे आज सकाळच्या सुमारास जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात बैलांसाठी गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. गावत कापत असताना झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आरडाओरड केल्याने बाजुच्या शेतक-यांनी धाव घेतल्याने वाघाने तेथून पळ काढला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

Post a Comment

0 Comments