कुरखेडातील अनधिकृत डम्पिंग हटविण्याच्या प्रक्रियेला वेग lokpravah.com

नागरिकांच्या आंदोलनाला यश 



कुरखेडा : नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत स्थानिक नगरपंचायत येथील अवैध डम्पिंग हटविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी येथील नपं पदाधिका-यांनी जिल्हा मुख्यालयी अधिकाऱ्यांची भेटून घेवून निवेदन व प्रस्ताव सदर केले आहे. नागरिकांच्या आक्रमकतेसमोर नगरपंचायत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. 

कुरखेडा शहरातील सती नदीकिनारी व प्रभाग 15, 17 परिसरात असलेल्या डम्पिंगमध्ये कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले होते. येथील संपूर्ण घाण उचलून अनाधिकृत डंपिंग बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. आंदोलनामुळे जागे झालेल्या नगर पंचायत प्रशासनाने नगराध्यक्ष अनिता बोरकर यांच्यासोबत आरोग्य व स्वच्छ्ता सभापती नंदेश्वर, उपाध्यक्ष जयश्री रासेकर, नगरसेवक जयेंद्र चंदेल, नगरसेविका तितीरमारे, आशा तुलावी, अभियंता खापरे यांनी जिल्हा मुख्यालयकडे धाव घेत जिल्हाधिकारी व वनसंरक्षक यांच्याकडे लवकरात लवकर कुरखेडा येथे डम्पिंगकरिता जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव सदर केला आहे. त्यामुळे डम्पिंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Post a Comment

0 Comments