कुरखेडा येथे आम आदमी पक्षाची स्थापना lokpravah.com

शेकडो उवकांचा पक्षात प्रवेश


कुरखेडा :केजरीवाल यांच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवत आज कुरखेडा येथे तालुक्यातील शेकडो युवकांनी आम् आदमी पक्षात प्रवेश केला.
आज किसान मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आम् आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांच्या हस्ते शेकडो युवक आम् आदमी पक्ष प्रवेश करून इनकलाब जिंदाबाद चा नारा देत नवीन राजकीय क्रांतीची सुरुवात कुरखेडा येथे केली.
कुरखेडा तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावण्यात व सामान्य नागरिकांना न्याय देण्यात सध्याचे स्थानिक राजकीय पुढारी अन्याय करत असून लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सर्व राजकीय पक्ष अपयशी असून दिल्ली व पंजाब राज्यात ज्या प्रकारे कमालीची सफलता पक्षाला मिळाली आता संपूर्ण देशात राजकीय क्रांती करिता आम् आदमी पक्ष हा एकच पर्याय जनते समोर असून सर्वांनी आम् आदमी पक्षात प्रवेश करून पक्ष मजबूत करण्यास सहकार्य करावे असे आव्हान प्रकाश जीवानी, गड़चिरोली जिला उपाध्यक्ष यांनी केले आहे. सदर प्रवेश कार्यक्रमास भारत दहलानी तालुका प्रमुख वडसा,आशीष घुटके, शहर प्रमुख वडसा,तबरेज खान , शहर उपप्रमुख वडसा ,भीमराव मेश्राम संगठन मंत्रि,आंचल खोबरागड़े, वार्ड प्रमुख हनुमान वार्ड देसाईगंज वडसा,आरिफ शेख, अल्पसंख्यक प्रमुख वडसा, तसेच कुरखेडा येथील असंख्य युवक प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments