गडचिरोली : विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमच एका व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांना 'पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड २०२५' ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, जिल्ह्यातील विकास कार्य आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या योगदानाची दखल घेतली गेली आहे.
डॉ. प्रणय खुणे हे कुरखेडा तालुक्यातील रहिवासी असून, ते एक यशस्वी उद्योगपती तसेच निष्ठावान समाजसेवक म्हणून ओळखले जातात. नक्षल प्रभावित आणि जंगलग्रस्त भागात त्यांनी ८०० किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते व पुल्यांचे बांधकाम करून जिल्ह्याच्या विकासाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजही ते वैयक्तिकरित्या या भागातील गावांना भेटी देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतात आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देतात. गोरगरीब, शोषित आणि वंचित घटकांसाठी त्यांचे अथक प्रयत्न आणि कटिबद्धता यामुळेच हा सन्मान मिळाला आहे.
या सन्मानानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश भाऊ गेडाम, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा, उपाध्यक्ष भारत खटी, राहुल भाऊ झोडे, विदर्भ अध्यक्ष जावेद अली सय्यद, नेताजी पाटील सौंदरकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, राकेश भाऊ खुणे, पुरुषोत्तम भाऊ गोबाडे, नितेश भाऊ खुणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, कुरखेडा तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे, तालुका सचिव संतोष बुरांडे, दिनेश मुजुमदार, विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, लक्ष्मी कन्नाके, पुष्पा करकाडे, पूनम हेमके, विशाखा सिंह, लीना विश्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे, लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी, तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांसह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. संपूर्ण विदर्भातून डॉ. खुणे यांच्यावर अभिनंदनाची झोडपून ओतप्रवाह सुरू आहे.
हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विकास प्रयत्नांना राष्ट्रीय पटलावर आणणारा एक मैलाचा दगड आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments