गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट गाठून सेवेचे व्रत धारण करावे. आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन lokpravah.com

कुरखेडा येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा शहर कुरखेडाच्या वतिने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार         गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या माध्यमातून यश संपादन करून त्यांनी सेवेचे व्रत धारण करावे असे प्रतिपादन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले ते भारतीय जनता पार्टी  शहर कुरखेडच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा निमित्त भाजपा शहर कुरखेडा च्या वतिने आज संस्कार पब्लिक स्कूल च्यासा सांस्कृतिक सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा व  सर्पमित्राना साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.


      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, शहर विचार मंचाचे संयोजक तथा भाजपा जेष्ठ पदाधिकारी माधवदास निरंकारी,अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बबलू भाई हुसेनी, भाजपा जेष्ठ नेते विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, पाणीपुरवठा सभापती तथा तालुका महामंत्री अडोकेट उमेश वालदे , आयोजक भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक रामभाऊ वैद्य,नगरसेवक अतुल झोडे,नगरसेविका दुर्गा गोटेफोडे महिला तालुकाध्यक्ष जयश्री मडावी,नगरसेविका अल्काताई गिरडकर न प सभापती गौरी उईके  भाजयुमो तालुका महामंत्री उल्हास देशमुख, तुषार कुथे भाजपा  पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक एडवोकेट उमेश वालदे, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे यांनी मार्गदर्शन केले.

 यावेळी कुरखेडा शहरातील शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, स्वर्णदीप हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गो. ना. मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालय ,संस्कार पब्लिक स्कूल तथा जुनियर कॉलेज कुरखेडा येथील प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा व त्यांच्या पालकांचा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सोबतच कुरखेडा येथील सर्पमित्र यांना भेटवस्तू देऊन त्यांचा पण गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, यांनी केले तर सूत्रसंचालन  भाजयुमो तालुका अध्यक्ष अध्यक्ष विनोद नागपूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सदस्य यांनी सहकार्य केले.

यावेळी मोठ्या संख्येत गुणवंत विद्यार्थी,पालक,शिक्षक व सर्प मित्र उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments