संकटाचा सामना करण्याकरीता संघटन शक्ती मजबूत करा lokpravah

 कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबूले यांचे आवाहनकूरखेडा :   शासनाद्वारे कर्मचा-यांना  जूनी पेंशन नाकारने, अनेक विभागांत अल्प मोबदल्यात कर्मचा-यांना राबविने, दोन कोटी रोजगार निर्मीतीचे आश्वासन देत प्रत्यक्षात अनेकांचे रोजगार हिरावणे या धोरणामूळे‌ व खाजगीकरणामूळे कर्मचारी वर्गासमोर गंभीर संकट निर्माण झाला आहे. या संकटाचा सामना करण्याकरीता कर्मचारी संघटनानी संघटन शक्ती मजबूत करीत संघर्षाची भावणा मनात निर्माण करावी, असे आवाहन कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबूले यानी केले

        किसान भवन कूरखेडा येथे तालुका ग्रामसेवक संघटनेचा वतीने  सेवानिवृत्त,बदली झालेले तसेच नव्याने येथे रूजू झालेल्या कर्मचार्याचा सत्कार सभांरंभाचा अध्यक्षस्थाना वरून मार्गदर्शन करताना उमेशचंद्र चिलबूले बोलत होते कार्यक्रमाचे उदघाटन संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कविश्वर बनपूरकर जि प कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रतन शेंडे ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दामोधर पटले व जिल्हा संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व पंचायत समिती कुरखेडा येथील कर्मचारी बांधव उपस्थित होते .

कार्यक्रमात संघटनेचा वतीने सेवानिवृत्त झालेले विस्तार अधिकारी ए एन परशूरामकर,ग्रामसेवक डब्लू एस कोहरे,एन पी मेश्राम तसेच पदोन्नतीने बदली झालेले मानिक लांजेवार,विजय गडपायले,दिगांबर लाटेलवार, जयगोपाल बरडे बदली झालेले विस्तार अधिकारी राजकुमार पारधी,गूरूदेव नाकाडे, पूरषोत्तम बनपूरकर,गूलाब भोयर, महेन्द्र देशमुख, कैलाश कावळे, मधूकर दूनेदार,दादाजी घोडीचोर,विजय पत्रे,गोपाल सराटे,मानिक मेश्राम,मूरलीधर मेश्राम, रोजलीन खोबरागड़े, कैलाश सूर्यवंशी व नव्याने तालूक्यात रूजू झालेले अशोक प्रधान, विनोद धाईत, राजेश दोनाडकर,अंबादास राठोड,आरती भोयर,रोशनी सहारे यांचा मान्यवरांचा हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिवाकर निंदेकर संचालन दूर्योधन बारसागडे‌ तर आभार प्रदर्शन सचिव लोमेश किरणापूरे यानी केले यशस्वीतेकरीता संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गौतम गेडाम व सर्व सभासदानी सहकार्य केले

Post a Comment

0 Comments