शून्य ते 20 पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा भाजप प्रणित सरकारच्या तुघलकी निर्णयाचे शिवसेनेकडून निषेध lokpravah.com

 मराठी शाळा बंद केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करणार : शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल गडचिरोली : भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रात आल्या पासून जनतेच्या विरोधातील एका वर ऐक तुघलकी निर्णय घेण्यास सुरवात केलेली आहे, अशातच नुकताच एक निर्णय ० ते २० पट संख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्या मुळे गोर गरीब शेतकरी शेत मजूरांची  मुले कुठे शिक्षण घेणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे, गाव गावात ० ते २० पट संख्या असलेल्या, शासनाच्या मोफत शिक्षण मिळणाऱ्या शाळा असल्याने गावातील मुल मराठी शाळेत शिकायला जातात, जर गावातील शाळा बंद केल्यास लहान मुल बाहेर जावून शिकणार नाहीत, पर्यायाने बालपना पासूनच शिक्षणा पासून वंचित राहतील म्हणजे अनाडी रहतील, शिक्षणा अभावी मुले गुन्हेगारी कडे वळतील, गुन्हेगार प्रवुरुतीचे होतील, शासनाचा  शंभर टक्के साक्षर करण्याच्या उद्देश असफल राहील, या भाजप सरकारने घेतलेल्या तुघलकी निर्णयाने गडचिरोली जिल्ह्यातील ६३० शाळा बंद पडतील म्हणजे ७२८१ मुले शिक्षणा पासून वंचित राहतील, सविधनाच्या ४५ कलमा  नुसार तसेच RTE ACT नुसार परतेक बालकाला सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे, जर ०ते२० पटाच्या मराठी शाळा बंद करण्याचा  तुघलकी निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारने हा महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय आश्चर्य कारक वाटत आहे, मराठी चे नकली प्रेम दाखवणाऱ्या भाजप प्रणित सरकारचा असली चेहरा समोर आला आहे, ० ते २० पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments