गळफास घेऊन इसमाची आत्महत्या lokpravah.comचामोर्शी : पंख्याला दोरी अडकवून गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. निरंजन रामदास भगत (45) असे मृतकाचे नाव आहे.  

निरंजन रामदास भगत हे भेंडाळा येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यात होते. पती-पत्नी गुण्या गोविंदाने आपला संसार करीत होते. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्यांची पत्नी भेंडाळा येथे टेलरिंगचा व्यवसाय करीत होती व निरंजन भगत हा इलेक्ट्रिक फिटिंगचा व्यवसाय करायचा. अशातच, निरंजन भगत यांनी आपल्या राहते घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments