रामसागर तलावात आढळला युवकाचा मृतदेहlokpravah.com
आरमोरी : शहरातील रामसागर तलावात युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. आदित्य विनोद शिंदे (21) रा. देवरी जि. गोंदिया असे मृतकाचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील रहिवासी असलेला आदित्य शिंदे हा आई व भावासह शहरातील गुजरी वॉर्डात एका भाड्याच्या घरात राहत होता. अशातच शहरातील रामसागर तलावात दुपारी 2 वाजताच्या सुमारास आदित्य शिंदेचा मृतदेह तरंगताना नागरिकांना निदर्शनास आला. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनाकरिता मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. विशेष म्हणजे, भाऊ यश विनोद शिंदे याने आदित्य बेपत्ता असल्याची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिली होती. अशातच आदित्यचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार चिकनकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments