कुरखेडाच्या वतीने विदर्भवाद्यांचे आत्मक्लेश आंदोलनlokpravah.com
कुरखेडा : विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कुरखेडाच्या वतीने आज, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी कुरखेडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विराआंसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष घिसूजी खुणे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ग्यानचंद सहारे, रामचंद्र रोकडे, मुन्नाजी दुर्गे, राजीराम पात्रीकर, संजय करसाळ, सेवाराम ठेला तसेच खेडेगाव, हेटीनगर, नान्ही, धमदीटोला, पुराडा, बिजापूर व इतर गावातील विदर्भवादी महिला, पुरुष उपस्थित होते.

देसाईगंज येथेही आंदोलन
देसाईगंज : येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष शामराव वाघडे, युवक आघाडी अध्यक्ष अक्षय कुंदनवर, तालुका उपाध्यक्ष किशोर धनोजे, तुळशीराम नेवारे, अर्शी शेख, दिनेश पाजी, अक्रम शेख, महेश नागेश, चांद शेख, जब्बार शेख, सलमा बेगम, सबना शेख, सुपिया शेख, पलक शेख, गुलाब वाघरे, दिगंबर गुरनुले, संजय राऊत, रामेश्वर शेंद्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments