गुणवंत होण्यापेक्षा ज्ञानाने मोठे होणे काळाची गरज : डॉक्टर प्राध्यापक जगजीवन कोठांगले यांचे प्रतिपादन

शासकीय कर्मचारी आदर्श ग्रुप मार्फत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ



कुरखेडा ;कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील हेमांडपंती शिव मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून दीपावलीच्या शुभ पर्वावर गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती कर्मचारी यांचा सत्कार व समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,यावेळी अध्यक्ष श्री कमल रणदिवे, सेवा निवृत अंगणवाडी पर्यशिका, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक जगजीवन कोठांगले ,खुशाल नेवारे ग्रामसेवक संघटना जिल्हा कोषाध्यक्ष प्राध्यापक तानसेन रणदिवे ,कृष्णा चौधरी पत्रकार, चुडा मनी वाघ, टिकाराम मांदळे ,दिनेश कळम, बाबुराव कुंमरे, सरपंच रतिराम मडावी, लालाजी गर्मडे, मंगरूजी कोहळे, वनिता वाडगुरे या शासकीय कर्मचारी आदर्श ग्रुप मार्फत गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती कर्मचारी सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर नवजीवन कोटांगले यांनी विद्यार्थी गुण मिळवून केवळ चालणार नाही, तर ज्ञानाने मोठे व्हावे शिक्षण हे कसे जीवन जगाचे शिकवते याचप्रमाणे प्राध्यापक तानसेन रणदिवे ,खुशाल नेवारे ,कमल रणदिवे ,यांनी विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना चांगल्या कामात वाव द्यावा असे या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले ,
यावेळी उत्कृष्ट गावातील गुणवंत विद्यार्थी वर्ग दहा वा पास होणारे
तुषार आनंदराव कोटांगले 88.60% गुण मनीष भगवान मडावी 82.50% सचिन गुरुदेव मडावी 79% भाऊ सागर पितांबर रणदिवे 79% सृष्टी सुधाकर वाडगुरे 78% या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करून रोख रक्कम प्रदान करण्यात आली ,
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर नेवारे ,संचालन मडावी सर व आभार प्रदर्शन भगवान मडावी केले, या कार्यक्रमासाठी आदर्श ग्रुपचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले,

Post a Comment

0 Comments