शहरातील वेडसर व्यक्तींना कपडे व खाद्य पदार्थ दान करून वंचितने केला दिपावलीचा पर्व साजरा lokpravah.com



गडचिरोली : गडचिरोली शहरात आपल्याच तालात वेडसरपणे (पागल ) फिरणा-या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपडे, ब्लांकेट व गोड- तिखट खारट खाद्य पदार्थ दान करून दिपावलीचा अनोखा पर्व साजरा केला.
दिवाळीच्या पर्वात सगळीकडे नव नविन कपडे व वस्तू घेऊन आपल्या कुटूंबासमवेत दिवाळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाते परंतु वेडसर व्यक्ती आपल्याच तालात वावरत असल्याने त्यांना कशाचेही घेणेदेणे नाही त्यामूळे वेड्या व्यक्तींच्या भावना समजून माणूसकीचा धर्म निभावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सदर अनोखा उपक्रम राबविल्याचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी सांगितले.
सदर उपक्रम राबवितांना बाळू टेंभुर्णे यांच्यासहीत वंचित बहुजन आघाडीचे बाशिद शेख, चंदू नैताम, जावेद शेख , भोजराज रामटेके, नरेश भूरसे, मनोहर कुळमेथे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments