शहरातील समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा lokpravah.com

अडचणी यथाशिग्र सोडविण्याचे  जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन


गडचिरोली : गडचिरोली शहरातील विविध वार्डातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारी, अडचणी व समस्यांची दखल घेत व त्या समस्या यथाशिग्र मार्गी लावण्यासाठी गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेतली व शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली.

      नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी शहरातील विविध वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने वार्डातील नाली स्वच्छता, दिवाबत्ती, घन कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणीपुरवठा, रस्त्यावरील अतिक्रमण, नागरिकांचे आरोग्य तसेच इतर समस्या जाणून घेऊन त्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली शहरातील रामनगर, लांजेडा, स्नेहनगर, इंदिरानगर  तसेच विवेकानंदनगर ,गोकुळनगर, चनकाई नगर, कॅम्प एरिया, कॉम्प्लेक्स-विसापूर, पंचवटी नगर, हनुमान वार्ड, तेली मोहल्ला इत्यादी वार्डात दौऱ्या दरम्यान अनेक नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी बाबत आपली व्यथा योगीताताई पिपरे यांच्या समोर मांडली असता त्यांची जाण ठेवून  व आपली शहरातील समस्यांबाबत जबाबदारी लक्षात घेत सर्व नागरिकांच्या समस्या ,तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या व त्या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यासाठी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेतली व समस्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली व सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी त्यांच्याकडे रेटून धरली.*

*तसेच गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे मात्र हे काम सुरू असताना अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक बनवताना दुभाजक खुला करण्यात न आल्याने अनेक नागरिकांना ये- जा करताना अडचण निर्माण होत आहे. चंद्रपूर मार्गावरील अयोध्या नगर जवळील डॉक्टर किंलनाके यांच्या दवाखान्याजवळ रस्ता दुभाजक खुला करणे आवश्यक आहे. सर्व शासकीय कार्यालये कॉम्प्लेक्स ला असल्याने या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांसाठी  रस्ता दुभाजक खुला नसल्याने यु टर्न मारून ये- जा करावी लागते यात नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील दुभाजक तत्काल खुला करण्यात यावा तसेच चामोर्शी रोडवरील पोस्ट ऑफिस समोरील कॅम्प एरिया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक खुला नसल्याने वाहन धारकांना अडचण होत आहे त्यामुळे पोस्ट ऑफिस लगतचे दुभाजक खुल्या करण्यात यावे कारण या मार्गावरून गोकुळ नगर तसेच कॅम्पएरिया रामनगर मधील हजारो नागरिक दररोज ये-जा करतात मात्र दुभाजक खुला नसल्याने त्यांना चौकात जाऊन परत वापस यावे लागते ही अडचण लक्षात घेता चामोर्शी मार्गावरील पोस्ट ऑफिस समोरील दुभाजक खुला करून देण्यात यावा, तसेच शहरातील अतिक्रमण संदर्भात योग्य निर्णय घेण्यात यावा,  इंदिरा नगर व गोकुळ नगर वार्डातील नगर परिषद शाळेचा प्रश्न लवकर निकाली लावावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी सर्व अडचणी समस्या समजून घेऊन मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्ग चे अधिकारी यांना सूचना करून समस्या यथाशिग्र मार्गी लावण्याचे आश्वासन योगीताताई पिपरे यांना दिले. निवेदन देतांना माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम प्रामुख्याने उपस्थित होत्या.*

Post a Comment

0 Comments