गोर- गरिबांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटिबद्ध lokpravah.com

माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन


गडचिरोली : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या गोर-गरीब ,शोषित पीडित व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी नानाविध योजना राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गरीब नागरिकांना शोचालय मंजूर केल्या जात आहे तसेच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अनेक अडचणी व त्रास सहन करावा लागत होता याची जाण ठेवून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना मोदी सरकारने अंमलात आणली व आतापर्यंत 10 कोटी महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून पोस्टकार्ड भरून पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदींजींना पाठविण्याचा उपक्रम सुरू असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले.


याच उपक्रमाच्या माध्यमातून सर्व सामान्य गरीब , कामगार वर्गातील नागरिक, महिलांना मोदींजींचे आभार व धन्यवाद मानण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पोस्टकार्ड लिहून आदरणीय मोदींजींचे आभार मानावे असे आवाहन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले आहे.*
*रामनगर वार्डात आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांकडून धन्यवादाचे पोस्टकार्ड लिहून घेतांना महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला भाजपचे महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.व यावेळी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आदरणीय मोदींजींचे धन्यवाद मानणारे पोस्टकार्ड स्वीकारण्यात आले.

एकात्म मानवतावाद व अंतोदय प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची प्रेरणा घेऊन "अंत्योदय ते नव भारत उदय " संकल्पनेस प्राधान्य देत देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी देश सेवेसाठी अंतोदयाचा संकल्प करीत गोरगरीब शोषित व पीडित व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी व कल्याणाकरिता सतत सेवाव्रत आहेत. या सेवेकरीता केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून माननीय पंतप्रधानांना *"धन्यवाद मोदीजी"* पोस्टकार्ड पाठवून कृतज्ञता व्यक्त करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
     
  या अभियानाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर 2022 रोजी गांधी जयंती पासून करण्यात आला असून या अभियानाचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर अभियानाचा समारोप 15 नोव्हेंबर 2022 बिरसा मुंडा जनजाती गौरव दिनी 10 लाख कार्ड्स भाजपा मुख्यालय नवी दिल्ली येथे हस्तांतरण करून होणार आहे.*
  *यावेळी रामनगर वार्डातील शौचालय चे लाभार्थी  पुरुषोत्तम होलगीरवार, आम्रपाली रामटेके , तुळशीराम गिरडकर, भावना महेंद्र गद्दमवार, तसेच उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी शालू फुलचंद मरसकोल्हे व नयना सिद्धार्थ रामटेके इत्यादी महिला लाभार्थ्याकडून पोस्टकार्ड भरून घेऊन ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाला वार्डातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments