शिवसेना महिला आघाडीतर्फे रावण दहन व दसरा मेळावा लाईव्ह कार्यक्रम lokpravah.com

चंद्रपूर : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चिंचाळा येथे रावण दहन व दसरा मेळावा लाईव्ह कार्यक्रम बुधवार ता. 5 ला पार पडला.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांच्या पुढाकाराने तुळजाभवानी मंदिर, चिंचाळा येथे नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल दसऱ्यानिमित्त भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वेशभूषेतील मुलांच्या हस्ते रावण दहन करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा येथील मुलांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) मुंबई येथील एकनिष्ठ दसरा मेळावा लाईव्ह दाखविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचे भाषण अर्थातच शिवसेना विचारांचा अनेकांनी लाभ घेतला. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर ठावरी, प्रमोद नलगे, देविदास पुसदेकर, सुप्रित रासेकर, निखिल घाडगे, गजानन पुनवटकर, प्रवीण धानवे, शंकर अतकरे, सौरभ बोरीकर, आकाश पावडे, योगेश पुनवटकर, प्रणय बानकर, चेतन पावडे, शुभम क्षीरसागर, रोनित नलगे, रोहन नलगे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments