राज्यस्तरीय धनोजे कुणबी उपवर-उपवधू मेळावा lokpravah.com

वणी येथे २४ व २५ डिसेंबर २०२२ ला आयोजनवणी  : धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती द्वारा पुरस्कृत व धनोजे कुणबी समाज संस्‍था वणीतर्फे आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी उपवर- उपवधू परिचय मेळाव्‍याचे द्वि-दिवसीय आयोजन २४ व २५ डिसेंबर २०२२ ला वसंत जिनींग लॉन व शेतकरी मंदिर हॉल वणी येथे करण्यात आलेले आहे.

धनोजे कुणबी उपवर-उपवधु मेळावा आयोजन समितीद्वारे परिचय मेळाव्‍यात स्‍मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी उपवर-उपवधूंची सविस्‍तर माहिती भरून १० डिसेंबरपर्यंत कार्यालयात नाेंदणी करावी. तसेच 10 डिसेंबरपूर्वी https://vivah.dkwani.org या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकता. तरी या परिचय मेळाव्यात उपवर-वधूंनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती, धनोजे कुणबी समाज संस्‍था वणी कार्यकारणी मंडळ, परिचय मेळावा आयोजन समितीच्‍या वतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments