एका आठवड्यात थांबविले दोन बालविवाह lokpravah.comजिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांची कार्यवाही

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीमनी सदर बालविवाह थांबविला. सदर घटना ताजी असताना त्याच आठवडयात चामोर्शी तालुक्यातील बालिकेचा विवाह वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात मुलाच्या घरी बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी चामोर्शी तालुक्यातील बालिकेचे घर गाठून बालिकेच्या वयाची खात्री केली असता सदर बालिकीचे वय निश्चित बाबत फरक जाणवत होते त्यानुसार त्यांना बालिकेचा जन्मपुरावा दाखवण्यासंदर्भात सांगितले परंतु त्यांनी बालिकेचे कागदपत्र दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे सदर पुरावा सादर केल्याशिवाय लग्न करू नका अशी तंबी पालकांना दिली. लग्न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी ताकीत देण्यात आली.त्यानुसार बालिकेला व पालकांना बाल कल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले. बालिकेच्या टी.सी. व जन्म दाखला ची पडताळणी केली असता बालिकेचे वय 16 वर्षे 11 महिने होते.त्यानुसार बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका अशी हमी पत्र पालकांकडून लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले .
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे,सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे,संरक्षण अधिकारी चामोर्शी पुरुषोत्तम मेश्राम यांनी कार्यवाही केली.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री no,1098 या क्रमांक वर बाल विवाह बाबत संपर्क साधावे नाव सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Post a Comment

0 Comments