आशा वरील अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही : कॉ झोडगे यांचा इशारा lokpravah.com

कोरचीत आशा व गट प्रवर्तक संघटनेचा मेळावा व किमान वेतन लागू करा यासाठी निदर्शने.


कोरची:--आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेचा तालुका स्तरीय मेळावा स्थानिक गोटुल सभागृहात कॉ विनोद झोडगे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली दि 13 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिवकॉ राजिराम ऊयके ,तालुका अध्यक्ष कॉ देशिर घाटगुमर,तालुका सचिव कॉ किरण गजभिये, शापोआ युनियनचे अध्यक्ष अशोक सोनवाणे,महेंद्र द्यान वाडकर ,संगीता गेडाम,सुनीता कऱ्हाडे,विमल बनसोड,सरिता गेडाम,शारदा काटेगे यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याची सुरुवात स्वागत गीतांनी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात परंतु त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुधा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात ज्यामध्ये आता आभा कार्ड काढण्यासाठी आशा वर्कर वर दबाव आणल्या जात आहे या कामावर संघटनेचा बहिष्कार आहे.आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आशा वर्कर कडून सातत्याने सुरळीतपणे निभवली जात असतांना सुद्धा ,आरोग्य संचालकांनी 24 जून 2022 रोजी एक आदेश काढून कामात हयगय करणाऱ्या आशा वर्कर ला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे अत्यंत चुकीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आशा वर्कर वर अन्याय होणार आहे तेव्हा वरील आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा आयटक च्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देत आशा वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संघटनेचे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांनी स्थानिक मेळाव्यात घेतली आहे.
सदर मेळाव्यात आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या ज्या मध्ये आरोग्य वर्धिनी अनंतर्गत इंसेंटिव्ह फार्म चे मासिक मिळणारे 1000 रुपये मागील अनेक महिन्या पासून थकीत
आहेत ते त्वरित देण्यात यावे,वाढीव मानधन दर महिन्याला देण्यात यावा दिवाळी बोनस म्हणून दरवर्षी 5000 रू.लागू करण्यात यावा.,काही ठिकाणी कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्राम पंचायत कडून आता पर्यंत मिळाला नाही,दर महिन्याला वेतन चिट्टी देण्यात यावे, आशा व गट प्रवर्तक महिलांना किमान 24 हजार वेतन,शासकीय दर्जा,सामाजिक सुरक्षा,म्हातारपणी पेन्शन,आदी मागण्या विषही चर्चा करून पुढील लढा येत्या हिवाळी अधीवेशनादरम्यान तीव्र करणार असल्याचा निर्णय आशा व गट प्रवर्तक महिलांनी घेतला व पुढील 3 वर्षा साठी 17 महिला कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून अधक्ष म्हणून संगीता गेडाम,तर सचिव कॉ सुनीता कऱ्हाडे,कार्याध्यक्ष कॉ विमल बनसोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मेळाव्याचे संचालन सुनीता कऱ्हाडे
     तर प्रास्ताविक कॉ किरण गजभे व आभार कचिर बई शहारे यांनी मानले.यावेळी तालुक्यातील शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments