नाल्यावरील अतिक्रमण येत्या आठ दिवसात न हटविल्यास विद्यानगर येथील रहिवासी तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात lokpravah.comकुरखेडा : कुरखेडा - वडसा मार्गावरील नाल्यावर अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम हटविने बाबत आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यानगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपंचायतला दिलेला आहे.
कुरखेडा वडसा मार्गावरील मुख्य नाल्यावर अतिक्रमण करून नालाबुजवून त्यावर बांधकाम करण्यात आलेला आहे. सदर बांधकाम अवैध असल्याबाबत तहसीलदार यांनी प्राथमिक अहवाल नगरपंचायत ला पाठविला आहे. वन विभागाने आपल्या विभागामार्फत सदर जागेची चौकशी करून सदर जागा ही महसूल विभागाची असल्याच्या बाबत तहसीलदार कुरखेडा यांना कळविले आहे. परंतु प्रत्यक्षात कुठलाही विभाग हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने येथील नागरिक आता आक्रमक पवित्र घेत मोठा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तहसीलदार कुरखेडा यांनी दिनांक १३/०९/२०२२ ला पत्र क्रमांक कवि/अका/प्रस्तू - १/३३८/२०२२ अन्वय नगरपंचायतला सदर नाल्यावर जो बांधकाम आहे तो त्यांचे हद्दीत येत असल्याने त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाबाबत शहानिशा करून तसा अहवाल पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात हे अतिक्रमण काढून घ्या किंवा सदर अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्या संदर्भात कुठलीही मागणी नगरपंचायत ला केली नसल्याने नगरपंचायतने आपली बाजू सुरक्षित करत दिनांक 23 सप्टेंबरला तहसीलदार कुरखेडा यांना शासन निर्णयाचा हवाला देत सदर जागा महसूल विभागाची असल्याने नगरपंचायत अतिक्रमण काढण्यास असमर्थ आहे व ते शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन ठरेल असा उलट पत्र तहसीलदारांना पाठविलेले आहे. सदर पत्र व्यवहाराबाबत स्थानिक नागरिकांना कुठलीही माहिती उपलब्ध न झाल्याने आज आक्रमक झालेले विद्यानगर येथील नागरिक थेट नगरपंचायत येथे धडकले. येथे नगराध्यक्ष अनिता बोरकर व गटनेता आशिष काळे यांचे सोबत अध्यक्षांच्या कक्षात सदर अवैध बांधकाम व पूर परिस्थिती संदर्भात नगरपंचायत ची भूमिका जाणून घेण्यासाठी चर्चा झाली. या चर्चेमध्ये नगरपंचायतने आपण अतिक्रमण काढण्यासाठी तयार आहोत परंतु नियमानुसार सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने माननीय तहसीलदार यांनी तसे पत्र नगरपंचायत ला द्यावे असे बोलून दाखवले. सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने शासनाच्या जीआर प्रमाणे ज्या विभागाची ती जागा आहे त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे बोलले. जर तहसीलदार कुरखेडा यांनी नगरपंचायत कुरखेडा कडे अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची मागणी केली तर ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायतची असेल असे बोलून दाखवले.
कुरखेडा वडसा मार्गावर मुख्य नाल्यावर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहेत. सदर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामामुळे पावसाचे पाणी सतत साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच सदर परिसरात पावसाचे पाणी साचून विद्यानगर येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसत आहे. सदर अतिक्रमण पाठविण्यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये कार्यवाही न झाल्यास सर्व विद्यानगर वाशी अतिक्रमण हटविण्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरपंचायत कुरखेडा देण्यात आला.
मुख्याधिकारी चे नावाने असलेल्या पत्र त्यांची अनुपस्थिती असल्याने येथील नगराध्यक्ष अनिता बोरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला व येता शिग्र कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन सादर करताना विद्यानगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments