पुरोगामी युवक संघटनेतर्फे शहरात दुचाकी रॅली lokpravah.com




गडचिरोली : हाॅटेल लेक व्ह्यू येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीती बैठक आणि भव्य निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी युवक संघटनेतर्फे भाई अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरातून शेकडो दुचाकींची रॅली काढण्यात आली.
पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, मुंबई प्रदेश विद्यार्थी अध्यक्षा साम्या कोरडे, अलिबाग चे युवक नेते विक्रम वार्डे, जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, श्यामसुंदर उराडे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

लाल बावटा मोठ्या दिमाखात फडकावत हि रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरविण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाबाबत जागृती करण्याचे काम करण्यात आले.

प्रशांत कोटगले, आकाश आत्राम, महेंद्र जराते, सुरज ठाकरे, मंगेश जराते, करण मेश्राम, बाबुलाल रामटेके, मंगेश भोयर, राहुल जराते, सातारकर, रमेश मडावी, ताराचंद कुकूडकर, नितेश मडावी, राहुल धाईत, प्रदिप पेंदाम, अविनाश जराते, वैभव कामिडवार, ज्ञानेश्वर पेंदाम,चेतन जराते, भिमदेव मानकर, राजेंद्र भोयर, निलकंठ गेडाम, ज्ञानेश्वर मेश्राम, रुषी गेडाम, पवन मेश्राम, जितेंद्र भोयर, मुखरु मेश्राम, सुभाष शेरकी, आदित्यनाथ मेश्राम, विजय गेडाम, अमोल शेरकी, हर्षल कोसरे, राहुल मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments