कूंभीटोला व नवेझरी येथील सरपंच पदाकरीता प्रत्येकी एक नामांकन lokpravah.comकूरखेडा : तालूक्यातील कूंभीटोला व नवेझरी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूकी करीता  गूरूवारी प्रत्येकी एका उमेदवाराने नामांकन दाखल केला. आज शूक्रवार रोजी नामांकन दाखल करण्याची अंतिम मूदत असल्याने अन्य सर्व उमेदवार आजच नामांकन दाखल करतील असा अंदाज आहेे.
गुरुवारी कूंभीटोला येथील कांग्रेस पक्षाकडून सरपंच पदाकरीता उर्मिला हलामी तर सदस्य पदाकरीता मधूकर गावळे,जिजा इस्कापे,स्मृती धाबेकर,अर्चणा गेडाम, महेन्द्र जनबंधू,भाग्यश्री भैसारे, नरेश मडावी या ७ उमेदवारानी नामांकन दाखल केले तर नवेझरी ग्रामपंचायत करीता सूद्धा कांग्रेस पक्षाचे दिगांबर कोकोडे यानी तर सदस्य पदाकरीता गणेश हलामी व मनेश दूगा यानी नामांकन दाखल केले आहे उर्वरीत सर्व ईच्छूक उमेदवार उद्याच नामांकन दाखल करतील असा अंदाज आहे आज कांग्रेस पक्षाचे उमेदवारांचा नामांकन दाखल करण्यात आले. याप्रसंगी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापति तथा यूवक कांग्रेस अध्यक्ष गिरीधर तितराम, माजी उपसभापति श्रीराम दूगा व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments