पक्षादेश झुगारणाऱ्या नगरपंचायत उपाध्यक्ष जयश्री रासेकर यांचे सदस्यत्व रद्द lokpravah

जिलाधिकारी यांचा आदेश

कूरखेडा : नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या
निवडणूकीत पक्षादेश झूगारत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार्या येथील नगरपंचायतच्या विद्यमान उपाध्यक्ष  
जयश्री रासेकर यांचे नगरपंचायतचे सदस्यत्व आज गूरूवार रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यानी आदेश पारीत करीत रद्द करण्यात आल्याने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
      
कूरखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये येथील एकूण १७ प्रभागा पैकी ९ प्रभागात भारतिय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते तर विरोधी शिवसेना-कांग्रेस आघाडीचे ८ उमेदवार निवडून आले होते मात्र येथे भाजपा पक्षाला स्पष्ट बहूमत असतानाही भाजपा पक्षाकडून प्रभाग क्र ८ मधून निवडून आलेल्या जयश्री रासेकर यानी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निवडणूकीत भाजपा पक्षाकडून अध्यक्ष पदाकरीता अधिकृत अल्का गिरडकर व उपाध्यक्ष पदाकरीता अधिकृत कलाम शेख याना मतदान करण्याचा पक्षादेश असताना तो झूगारत विरोधी शिवसेनेची उमेदवार अनिता बोरकर व उपाध्यक्ष पदाकरीता स्वताला मतदान करीत पक्षादेश झूगारला त्यामूळे येथे स्पष्ट बहूमत असतानाही भाजपाला सत्ता गमवावी लागली अशी तक्रार भाजपा जिलाध्यक्ष कीशन नागदेवे यांचा सूचनेनूसार भाजपा गटनेता कलाम शेख यानी जिल्हाधिकारी यांचा कडे दाखल केली होती या तक्रारीची जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा दालनात सूनावणी होत दोन्ही बाजूचा यूक्तीवाद एकत गैर अर्जदार जयश्री रासेकर यांचे सदस्यत्व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८६ चे कलम ३ (१)(ब) खाली अनहर्तेस पात्र ठरविण्यात येत रद्द केले .

Post a Comment

0 Comments