क्रिकेट स्पधेत जिल्ह्यातील 60 संघांचा सहभाग
गडचिरोली : अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 डिसेंबर पासून सुरु असलेल्या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून क्रिकेट सामना पाहण्यासाठी नागरिक, युवक, खेळाडू व महिलाही मैदानात गर्दी करतांना दिसत आहे. तसेच या स्पर्धेत जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक क्रिकेट संघ (टीम) सहभागी झाले असून स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दररोज 4 ते 5 क्रिकेट सामने खेळविण्यात येत असून प्रेक्षक मोठ्या प्रमाणात स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31000 रुपये व आकर्षक चषक भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या वतीने देण्यात येत असून धन्वंतरी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर अनंताजी कुंभारे व सिटी हॉस्पिटल गडचिरोलीचे संचालक डॉक्टर यशवंत दुर्गे यांच्या कडून द्वितीय पुरस्कार 21000 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर तृतीय पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक शिवसेनेचे गडचिरोली तालुकाध्यक्ष गजाननराव नैताम यांच्याकडून देण्यात येणार आहे.*
*या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून मार्कंडेय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत चलाख अनंत हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनंत कारेकर, बी एस ग्राफिक्स चे संचालक भुपेश डोंगरे कंत्रालदार प्रणय खुणे, श्री काँक्रीट प्रॉडक्ट व स्वस्तिक इंडस्ट्रीज चे संचालक नकुल कुकडपवार, हॉटेल लँडमार्कचे संचालक रहीम डोढिआ, भूमी एम्पायर गडचिरोली, आर्यन मोटर्सचे संचालक गुप्ताजी, साई समर्थ ट्रेडर्सचे संचालक उमाजी वासाडे, रवी फोटो स्टुडिओचे संचालक रवीभाऊ मेश्राम इत्यादी मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.
क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अनुराग पिपरे, नितेश खडसे,ऋषीकेश पिपरे, रुपराज वाकोडे, गजेंद्र डोमळे, प्रफुल चापले, विक्की कागदेलवार, किशोर खेवले, जगदीश गडपायले, अरुण शेडमाके, अक्की मडावी, भरत पाकमोडे, संजय बोधलकर, नरेंद्र भांडेकर, अशोक फुकटे, श्रीनिवास भुरसे राकेश नैताम , टेमसुजी नैताम तसेच अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब,गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर चे पदाधिकारी व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.
0 Comments