"त्या" सौभाग्यवतींच पोलिस शिपाई बनण्याचं स्वप्न भंग? police Bharti


मकरसंक्रांत विशेष

गडचिरोली : सर्वच जिल्ह्यात सध्या पोलिस शिपाई पदाकरिता भरतीप्रक्रीया सुरू आहे. पोलिस शिपाई बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या छोटया छोट्या मुलांकडे दुर्लक्ष करीत सकाळी 4 वाजेपासून उठून सलग पाच-पाच वर्षांपासून कठोर परिश्रम घेणा-या सौभाग्यवतींच  पोलिस बनण्याच स्वप्न जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र नसल्याच्या कारणाने भंग झाले आहे. बाहेर जिल्ह्यातील माहेर असलेल्या व गडचिरोली जिल्ह्यात सासरी नांदायला आलेल्या दहा वर्षांपासूनच्या सौभाग्यवतींना गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी प्रमाणपत्र असले तरी या जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून पोलिस भरतीस अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नांदायला आलेल्या अनेक सौभाग्यवतींच पोलिस शिपाई बनण्याचं स्वप्न भंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गडचिरोली पोलिस विभागांतर्गत पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई पदांच्या एकूण 508 रिक्त जागा भरण्यासाठी आवेदन मागविण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई चालक पदांकरिता 160 तर पोलिस शिपाई पदाच्या 348 जागांकरिता भरती प्रक्रिया पारदर्शकपने राबविण्यात येत आहे. मात्र या भरतीमध्ये सौभाग्यवतींना अपात्र घोषित केले जात असल्याने दहा वर्षांपासून जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सासरी मुलींचा हिरमोड झाला आहे. 

सर्वसाधारन घराण्यातील बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकयुवतींना आपल्या मेहनत व जिद्दीच्या भरोशावर पोलिस बनणे अगदी सोपे जात असल्याने पाच-दहा वर्षांपासून अफाट मेहन करीत जिल्हाभरातील युवक पोलिस भरतीची आतुरतेने वाट बघत असतात. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत सकाळ-संध्याकाळ शारीरिक कसरत करीत असतात. तर रात्रोच्या वेळेस अभ्यासात गुंतलेले असतात. जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असल्याने व जागा जास्त असल्याने युवकयुवतींचा कल पोलिस भरतीकडे जास्त असतो. त्यानिमित्ताने तासंतास लायब्ररीत बसून अभ्यास करताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची सवय जळली आहे. 

जिल्हाभरतीत सामावून घेण्याचा सौभाग्यवतींचा सूर
लग्न करून जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्याचे अधिवास मिळविण्याकरिता लग्नाला 15 वर्ष पूर्ण होणे बंधनकारक असते. मात्र, तोपर्यंत सौभाग्यवतींची नोकरीसाठी असलेली वय निघून जात असल्याने यावर प्रशासनाने वेगळी तरतूद करून जिल्ह्याच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचा सूर सौभाग्यवतींनी व्यक्त केला.
...........................

Post a Comment

0 Comments